निवडणूक प्रक्रिया प्रश्न उत्तरे
1.दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण
करा.
1)निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........... करतात.
(अ) राष्ट्रपती (ब) प्रधानमंत्री
(क) लोकसभा अध्यक्ष (ड) उपराष्ट्रपती
Ans-अ)राष्ट्रपती
(२) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त
म्हणून ........... यांची नेमणूक झाली.
(अ) डॉ.राजेंद्रप्रसाद (ब) टी.एन.शेषन
(क) सुकुमार सेन (ड) नीला सत्यनारायण
Ans-क) सुकुमार सेन
(३) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक
आयोगाची ....... समिती करते.
(अ) निवड (ब) परिसीमन
(क) मतदान (ड) वेळापत्रक
Ans-ब) परिसीमन
2.पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.
Ans-बरोबर
कारण:-1) निवडणुकीपूर्वी काही काळ व
निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व
मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन
करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते.
2) या
नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. गेल्या
काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील
कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे
दिसते.
(२) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार
संघात पुन्हा निवडणुका घेतात.
Ans-बरोबर
1) निवडणुकीमध्ये एखादा जर सदस्य निवडून आला काही कारणास्तव तिची मृत्यू झाली तर त्या वेळेस निवडणुका या घ्यायला लागतात .
3)एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात
निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
Ans-चूक
1)एखाद्या घटक राज्यात जर एखादी निवडणूक घ्यायचे असेल तर ते सर्व काम हे मतदार संघाचे असतात.
2)निवडणूक आयोग ची नेमणूक राष्ट्रपती करतो.
प्र5)थोडक्यात उत्तरे लिहा .
(१) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
Ans:-(१) मतदार याद्या तयार करणे : वयाची १८
वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला
मतदानाचा हक्क आहे. तो बजावण्यासाठी त्याचे
नाव मतदार यादीत असावे लागते. मतदार याद्या
तयार करणे, त्या अद्ययावत करणे, नव्या मतदारांचा
समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते.
मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक
आयोगाला आहे.
(२) निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्णकार्यक्रम
ठरवणे : निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक
आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात
केव्हा व किती किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या
हे निवडणूक आयोग ठरवते.
(३) उमेदवारांच्या अर्जांची छाननी :
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध
राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे
करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेतास्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात. अशा
अपक्ष उमेदवारांसह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या
सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो व त्यात
स्वतःसंबंधी सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जांची
काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते व पात्र
उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते.
(४) राजकीय पक्षांना मान्यता देणे : आपल्या
देशात बहुपक्षपद्धती आहे. तसेच नवनवे पक्ष निर्माण
होतात. पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात
येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची
मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता
रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला
असतो. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक
चिन्ह देते.
(५) निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे :
निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते
सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते.
त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे
अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे
निवडणूक आयोगाची आहेत.
2) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
Ans-1) भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व
न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने
स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत, त्यांत
आचारसंहितेचा (code of conduct) समावेश
करता येईल. गेल्या काही दशकांपासून निवडणूक
आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून
निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न
केला आहे.
2)निवडणुकीपूर्वी काही काळ व
निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व
मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन
करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. या
नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. गेल्या
काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील
कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे
दिसते.