3 उपयोजित इतिहास इयत्ता दहावी प्रश्न उत्तर
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पूर्ण करा.
(१) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय ........... या
शहराचे उत्खनन करताना सापडले.
(अ) दिल्ली (ब) हडप्पा
(क) उर (ड) कोलकाता
Ans-(क)
(२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे
आहे.
(अ) दिल्ली (ब) कोलकाता
(क) मुंबई (ड) चेन्नई
Ans-(अ)
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(२) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
(३) रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
(४) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि
लोकनृत्य
चुकीची जोडी -रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
बरोबर जोडी- रम्मन- धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य
2. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) उपयोजित इतिहास:-
Ans-1‘उपयोजित इतिहास’ या संज्ञेसाठी ‘जनांसाठी
इतिहास’ (पब्लिक हिस्टरी) असा पर्यायी शब्दप्रयोग
प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधींचे जे ज्ञान
इतिहासाद्वारे प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमान
आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल,
याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे
केला जातो.
2 वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर
उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय
घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या
घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी
इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते.
3 उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ
व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध
अंगांनी सहभाग असू शकतो. संग्रहालये, प्राचीन
स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा
सहभाग महत्त्वाचा असतो.
4 पर्यटनामुळे लोकांमध्ये
इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते.
समाजमनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते.
तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात
असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या
प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात.
2. अभिलेखागार:-
Ans-1 अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी
कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, इत्यादी जतन
करून ठेवली जातात.
2 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी
दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे
स्वतंत्र अभिलेखागार आहे.
प्र 3. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा.
1) जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा.
Ans-1) इतिहासाविषयी
लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात.
उदा., इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी
आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी असतो, दैनंदिन जीवनात
इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो,
इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक
क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी.
2 अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची
नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी
जोडणारे क्षेत्र म्हणजे ‘जनांसाठी इतिहास’.
3परदेशातील अनेक विद्यापीठांमध्येजनांसाठी
इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले
जातात. भारतात बंगळुरू येथे ‘सृष्टि इन्स्टिट्यूट
ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी’ या संस्थेत
‘सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी’ हा स्वतंत्र विभाग
आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि
संशोधनाचे काम चालते.
2 ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे ?
Ans-1 सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपण्याचे कार्य युनेस्कोने केलेले आहे
2 सर्व लोकांना जागृत करून दिलेले आहे सांस्कृतिक आणि वारसा जपण्याचे कार्य त्यांना दिलेले आहे
3 स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेतले आहे.
3 सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती हे शोधून लिहा.
Ans-1 आग्र्याचा किल्ला,अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, महाबळेश्वर पाचगणी ,खंडाळा ,लोणावळा, माथेरान,
4. संकल्पना चित्र पूर्ण करा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
Ans-मूर्त अमूर्त
1) प्राचीन स्थळे। 1) मौखिक परंपरा आणि त्या साठी उपयोगात आणली जाणारी भाषा.
2 )वास्तु 2) पारंपारिक ज्ञान
3) हस्तलिखिते 3) कला सादरीकरणाच्या पद्धती
4) शिल्पे 4) वैशिष्ट पारंपारिक कौशल्य
5. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
Ans-1) कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन,
स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल
आणि त्यामागील कारणपरंपरेची साखळी समजावून
घेणे. यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा
लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती
परस्परावलंबी असतात.
2)मानवाच्या उत्क्रांतीच्या
वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते
कृषीउत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले
विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत
महत्त्वाचे होते.
3)पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन
प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले,
विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर
अवलंबून असतात, हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा
इतिहास समजावून घेणे आवश्यक असते.
2) जागतिक वर्षच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनिस्को दारे जाहीर केली जाते.
Ans-1 पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून याविषयी आपल्या मनात आपुलकी असते.
2) हा वारसा पुढील मानवी पिढयांचया हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते.
3) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे त्याच्या दिशादर्शक तत्वे यांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा याची यादी युनिस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.
प्र 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1) पुरस्कार पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाचे संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा.
अ) विज्ञान। ब) कला।
क) व्यवस्थापन शास्त्र
Ans-अ) विज्ञान:- मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासा चे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात .त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो या शोधा मागील कारणपरंपरा ,कालक्रम आणि सिद्धांत याचा अभ्यास केला जातो विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी उपयुक्त ठरते.
ब) कला: कोणत्याही कलेचा विकास वैचारिक भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या आधारित अभिव्यक्त होत असते या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरा चा इतिहास समजून घ्यावा लागतो संबंधित कलाकृती इन कशी साकार झाली त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
क) व्यवस्थापनशास्त्र:- उत्पन्नाचे संसाधने मनुष्यबळ उत्पन्नाच्या विविध प्रक्रिया बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापन शास्त्राची आवश्यकता असते वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटना द्वारे हे व्यवहार चालू असतात .या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे त्यांच्या अभ्यास करणे व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी भूतकालीन यंत्रणाचा अभ्यास करणे आवश्यक असते त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.
2) उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो?
Ans-1) भूतकाळातील घटनाच्या आधारावरच मानवी वर्तमान काळी वाटचाल निश्चित करतो.
2) आपल्या पूर्वजांचे कर्तव्या त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती परंपरागत ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळतील उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाची जतन करता येते.
3) उपयोजित इतिहास द्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते .वर्तमानातील समस्यांचे सोडवणूक करता येते सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.
4) उपयोजित इतिहासाचा अभ्यासाच्या आधारित वर्तमान काळाचे यथा योग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.
3) इतिहासाच्या साधनांचे जतनव्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा.
Ans-1) किल्ले ,स्मारके ,राजवाडे ,अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे.
2) अनेक वस्तूंची नासधूस करणे, त्यावर नाव लिहिणे वा करणे हे टाकण्याबाबत उपाय योजावेत.
3) ऐतिहासिक नाणी इत्यादी वस्तू जपून हाताळण्यात.
4) लोकगीते आधी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.
5) प्राचीन ग्रंथाचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे.
6) या सर्व संसाधनाच्या जतनासाठी अनुभवी तज्ञ मंडळाचे सल्ले घ्यावेत.
7) ऐतिहासिक साधनाच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.
8) या साधनाचे महत्त्व समजायला पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे.
9) या साधनाविषयी ,प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे.
10) ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे.
No comments:
Post a Comment