google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : 7.खेळ आणि इतिहास प्रश्न उत्तरे इ 10वी

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Tuesday, May 18, 2021

7.खेळ आणि इतिहास प्रश्न उत्तरे इ 10वी

  7.खेळ आणि इतिहास प्रश्न उत्तरे  इ 10वी


1.रिकाम्या जागा भरा 

1) ऑलम्पिक स्पर्धाची परंपरा ----- येथे सुरू झाली.

अ)  ग्रीस           क) रोम

ब)   भारत         ड) चीन

Ans-अ)ग्रीस 


2) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला---- मह्णत .

अ) ठकी                  ब) कालिचंडिका

क) गंगावती               ड) चंपावती

Ans-अ)ठकी


ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुनहा लिहा.

1) मललखांब-शारिरिक कसरतीचे खेळ

2) वॉटर पोलो- पाण्यातील खेळ

3) स्केटिंग-साहसी खेळ

4)बुद्धिबळ -मैदानी खेळ

चुकीची जोडी-बुद्धिबळ -मैदानी खेळ

दुरुस्त  जोडी-बुद्धिबळ-बैठे खेळ


2.टीपा लिहा

1)खेळणी आणि उत्सव 

Ans-1) खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यांवर प्रकाश पडतो, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा  समजतात . महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले  करण्याची मोठी परंपरा आहे.

2)या मातीच्या किल्लयांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात .

3)महाराष्ट्रातील किल्लयांरचया साहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार  आहे .



2)खेळ आणि चित्रपट 

Ans-1) अलीकडच्या काळात 'खेळ' आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी  व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे .उदा, मेरी कोम आणि दंगल .मेरी कोम  ही ऑलम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियुद्ध आणि फोगट भागिना या पहिल्या महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत.

2) चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड ,त्या काळातील भाषा ,पेहराव ,सामान्य जनजीवन या सगळ्याचा सखोल अभ्यास करावा लागतो.

3) या गोष्टीचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. देशांतर्गत वा वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते .


3.पुढील  विधाने सकारण स्पष्ट करा.

1) सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे.

Ans-1) विसाव्या- एकविसाव्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे. ऑलिंपिक,  एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल , विंबल्डन यांसारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल ,लॉन टेनिस, सामन्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते.

2) ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा त्या खेळाचा आनंद घेत असतात.

3) उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला या जगभरच्या प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे.


4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा.

1) खेळांचे महत्त्व स्पष्ट करा.

Ans-1) खेळाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावणारे सामर्थ्य खेळामंध्ये आहे.

2) मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात. ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात  त्या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो.

3) शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात. खेळांमुळे मनोधर्य, चिकाटी, खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते.

4) सांघिक  खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य, संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्वगुणांचा विकास होतो.


2) खेळातून व्यवसायिक संधी कशी प्राप्त होतात ?

Ans -1) इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत. ऑलम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाचे राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते.

2)  खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षा पूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ञाची आवश्यकता असते . या तज्ञांना खेळाचा इतिहास ,मागील आकडेवारी ,खेळातील विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते. यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो.

3) दूरदर्शन वरून हॉकी, क्रिकेट ,फुटबॉल, कबड्डी, बुद्धीबळ इत्यादी खेळांच्या सामन्याचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते .विविध वाहिन्यांमुळे या खेळांसंबंधित  नोंदी ठेवणाऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे .खेळाशी संबंधित  असणाऱ्या वाहिन्या 24 तास सुरु असतात .त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत .

4) खेळांच्या स्पर्धा यांमध्ये पंचाची आवश्यकता असते म्हणून पंचया साठीदेखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.


5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

1) भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.

Ans-1) खेळांच्या स्पर्धाना जगभर मान्यता मिळाली आहे.   ऑलिंपिक,  एशियाड, दिव्यांगाचे ऑलिंपिक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ,कुस्ती ,बुद्धिबळ, इ. खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात .

2) आपल्या देशात हॉकी क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहेत.हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.

3)या खेळांच्या स्थानिक शहर ,तालुका ,जिल्हा, राज्य, राष्ट्र , आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात . राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते.


2) खेळ आणि इतिहास  यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा.

Ans-1) इटलीतील पंपोई शहराचे उत्खननात एक भारतीय हस्तिदंत  बाहुली सापडली. 

2) ती पहिल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे.

3)त्यावरुन भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंध अनुमान करता येते.अशा रीतीने उत्खननात  मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधली परस्परसंबंधावर प्रकाश टाकू शकतात.


3) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.

Ans- 1)मैदानी खेळ हे मैदानात खेळे जातात याउलट बैठे खेळ बसून खेळे जातात.

2) मैदानी खेळ  खेळामुळे आपला व्यायाम होतो याउलट बसून खेळामुळे आपली बुध्दी वाढते.

3)मैदानी खेळ उदा, क्रिकेट ,टेबल टेनिस, फुटबॉल,इ. याउलट बैठे खेळ उदा, पत्ते, सोंगट्या, काचकवडया इ.







1 comment:

Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map