प्रसारमाध्यमे आणि इतिहास प्रश्न उत्तरे
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून
विधाने पूर्ण करा.
(१) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ...........
यांनी सुरू केले.
अ)जेम्स ऑगस्टस हिकी
(ब) सर जॉन मार्शल (क) ॲलन ह्यूम
Ans-जेम्स ऑगस्टस हिकी
(२) दूरदर्शन हे .......... माध्यम आहे.
(अ) दृक् (ब) श्राव्य
(क) दृक्-श्राव्य
Ans-क) दृक्-श्राव्य
ब) पुढीलपैकी चुकीची जोडी आेळखून लिहा.
(१) प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे
(२) दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
(३) दीनबंधु - कृष्णराव भालेकर
(४) केसरी - बाळ गंगाधर टिळक
Ans-प्रभाकर - आचार्य प्र.के.अत्रे
बरोबर जोडी
प्रभाकर-भाऊ महाजन
2.टीपा लिहा
1) वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य
Ans-1) लोकजागृती व लोकशिक्षण केले. भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाचे थोर वर्णन केले.
2) सामाजिक राजकीय व धार्मिक चळवळींना पाठिंबा दिला साम्राज्यवादी धोरणाला विरोध केला.
3) पाश्चात्य विद्या समाजप्रबोधनाचे काम केले. व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून.
4) तात्कालीन सामाजिक आणि राजकीय वाचा फेडीला त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
2) प्रसारमाध्यमांची आवश्यकता
Ans-1) माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी
प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.
2)अग्रलेख,विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्यभाग असतात.
3)वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून
वाचकही आपले म्हणणे मांडत असतात. लोकशाही
अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात.
3) प्रसारमाध्यमांची संबंधित व्यवसाय क्षेत्रे
Ans-(१) गृतापत्रांत अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात
(२) तसेच बातम्या जमा करणारे वाताहर तंत्रज्ञ या सर्वाची गरज असते
(३) इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार, सादर करणारे तंत्रज्ञ, निवेदन इत्यादींची गरज असते.(४) या सर्व माध्यमांतून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते.
3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे
चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
Ans-1)प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे
चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रत्येक
वेळी वर्तमानपत्रांमधून आपणांसमोर येणारी माहिती
वास्तवाला धरून असेलच असे नाही. आपणांस ती
तपासून घ्यावी लागते.
2)अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे.
‘स्टर्न’ नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ
हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत
घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना
विकल्या.
3)हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित
रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. परंतु
त्या रोजनिशा नकली असल्याचे सिद्ध झाले.
यामुळे प्रसारमाध्यमांमधून मिळणारी माहिती
वापरताना काळजी घ्यावी लागते.
2) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते.
Ans-1)वर्तमानपत्रांमधील सदरांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी,
शंभर वर्षांपूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती
इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित
असतात.
2)या प्रकारच्या सदरांमधून आपणांस
भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय,
ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या
पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्यास मदत होते.
3)वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा
विशेषांक काढावे लागतात. उदा., १९१४ मध्ये
पहिले महायुद्ध सुरू झाले त्याला २०१४ मध्ये १००
वर्षे पूर्ण झाली. त्या युद्धाचा सर्वंकष आढावा
घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास
माहीत असावा लागतो. १९४२ च्या ‘चले जाव’
आंदोलनाला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली. अशा
प्रसंगी वर्तमानपत्रे लेख, अग्रलेख, दिनविशेष,
आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्या
वेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो.
3) सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
Ans-1) दूरदर्शन हे माध्यम आशे आहे की त्यामध्ये आपण एखादी गोष्ट पाहू शकतो आणि ऐकू शकतो हे साधन दृकश्राव्य साधनांमध्ये मोडते.
2)रदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने त्याने
वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा
ओलांडून जनतेला ‘प्रत्यक्ष काय घडले’ हे दाखवायला
सुरुवात केली. जनतेला एखाद्या घटनेचा ‘आँखो
देखा हाल’ पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही.
3) म्हणून सर्व माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा.
1) वर्तमानपत्राची उद्दिष्टे स्पष्ट करा.
Ans-(१) स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविणे.
(२) देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे.
(३) लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे
(४) समाजातील अयोग्य पटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे.
2. आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे ,हे स्पष्ट करा.
Ans-1)आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा महत्त्वाचा
विषय असतो. उदा., १५ ऑगस्ट १९४७ किंवा
त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची
भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा
समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो.
2)आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी
इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय
नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस १ वर्ष, २५ वर्षे, ५० वर्षे, १०० वर्षे वा
त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्षे पूर्ण होत असतील तर
त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते.
3)राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना
इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवरही
दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो.
5.पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
.
आकाशवाणी : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये
‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ (आयबीसी) या नावाने दर
दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र
सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे ‘इंडियन
स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ (आयएसबीएस) असे नामकरण
केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण ‘ऑल
इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.
भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती
व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम
व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे
सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले.
आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व
साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात.
त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया
यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात.
‘विविधभारती’ या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा
आणि १४६ बोलीभाषांमध्येकार्यक्रम र्य सुरू झाले. अलीकडच्या
काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत.
उदा., रेडिओ मिर्ची
1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते?
Ans-AIR च्या खात्यांतर्गत चालते
2.IBC चे नामकरण काय झाले ?
Ans- नंतर ब्रिटिश सरकारने याचे कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केले.
3. विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषेमध्ये कार्यक्रम सादर होतात.
Ans -या लोकप्रिय रेडिओ सेवेदवारा 24 भाषा आणि 146 बोलीभाषेमध्ये कार्यक्रम सुरू झाले.
4) आकाशवाणी हे नाव कसे पडले ?
Ans- ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनांनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले.
6. संकल्पनाचित्र तयार करा
वर्तमानपत्रे | आकाशवाणी | दूरदर्शन | |
सुरुवात/ पार्श्वभूमी | जेम्स ऑगस्टस हिकी याने २९ जानेवारी १७८० रोजी 'बेंगॉल गॅझेट' हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. | १९२४ साली मद्रास (चेन्नई) येथे | १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. |
माहितीचे/ कार्यक्रमांचे स्वरूप | मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. | विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. | जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात. |
कार्ये | (१) दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे (२) लोकजागृती करणे व लोकशिक्षण (३) माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे (४) अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे. | (१) विविध क्षेत्रांतील बातम्या देणे (२) संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे (३) कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे (४) व्याख्यानांद्वारे, चर्चाद्वारे पर्यावरण - संस्कृती संवर्धन विषयक कार्यक्रम सादर करणे. | (१) मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे (२) लोकशिक्षण करणे (३) समाजोपयोगी प्रसिद्धी देणे (४) सामाजिक समस्यांबाबत वाईट रूढी-परंपरा विरुद्ध समाज प्रबोधन करणे. |
No comments:
Post a Comment