google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन प्रश्न उत्तरे

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Saturday, May 22, 2021

9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन प्रश्न उत्तरे

 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन प्रश्न उत्तरे



 १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण

करा.

(१) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन 

चित्रकाराने रेखाटलेल्या ........... या चित्राचा 

समावेश लुव्र संग्रहालयात आहे.

(अ) नेपोलियन (ब) मोनालिसा

(क) हॅन्स स्लोअन (ड) दुसरा जॉर्ज

Ans-ब) मोनालिसा

(२) कोलकाता येथील ........... हे भारतातील 

पहिले संग्रहालय होय.

(अ) गव्हर्न्मेंट म्युझियम

(ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय

(क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

(ड) भारतीय संग्रहालय

Ans-(ड) भारतीय संग्रहालय



(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

(२) बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी

(३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ

(४) जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर

Ans-(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली

महाराज सयाजीराव विद्यापीठ - वडोदरा


२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि

इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात

Ans-1)ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे 

असतात.अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या

ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते.

2) ग्रंथालय ग्रंथाचे संकलन आणि त्याची पद्धतशीर आयोजन जतन आणि संवर्धन हे करत असतात आणि अभिलेखागार  जुने ग्रंथ जपत असतात.

3) म्हणून अभिलेखागार ए व ग्रंथालय नियतकालिका आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.


२) विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची 

आवश्यकता असते.

Ans-आपल्याला माहीतच आहे की कुठलेही जर प्रशिक्षण करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला विविध अभ्यास आपल्याला हा करावा लागतो तसेच विविध साधण्यासाठी देखील अभ्यास करावा लागतो ते खालीलप्रमाणे  मौखिक साधण्यासाठी वेगळा आहे लिखित साधण्यासाठी वेगळा आहे आणि भौतिक साधननासाठी वेगळा आहे.

1) मौखिक साधने:-उपयुक्त प्रशिक्षण ः (१) समाजशास्त्र

(२) सामाजिक मानवशास्त्र (३) मिथके आणि

भाषाशास्त्र (४) ग्रंथालय व्यवस्थापन (५) इतिहास 

आणि इतिहास संशोधनपद्धती (६) संशोधनपर लेखन.


2)भैतिक साधने:-पुरातत्त्वीय अभ्यासपद्धती, सिद्धान्त आणि

प्राचीन संस्कृती यांचा परिचय.

२. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, 

खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे 

प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय

वैशिष्ट्यांचे ज्ञान.

३. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक 

प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची 

माहिती.

४. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा 

क्रम यांचे ज्ञान.

५. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती 

बनवण्याचे कौशल्य.


3)लिखित साधने:-१. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि

त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान.

२. इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, 

साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, 

शासनव्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान.

३. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि

त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान.

४. कागदाचे प्रकार, शाई आणि रंग यांचे ज्ञान.

५. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या

स्वरूपाविषयीची माहिती.

६. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यांसाठीच्या

आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी 

उपकरणे आणि रसायने यांची माहिती.

७. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन 

आणि माहिती तंत्रज्ञान.

८. संशोधनपर लेखन.


3टिपा लिहा 

1)स्थल कोश:-

Ans-इतिहासाच्या अभ्यासासाठी 

भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या

संदर्भांत माहिती देणारे कोश आहेत.

(१) महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला 

स्थानपोथी (१४ वे शतक) या ग्रंथात महानुभाव पंथाचे 

प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी ज्या-ज्या गावी गेले त्या

गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची

कल्पना या ग्रंथावरून येते. लीळाचरित्रातील विविध 

घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने 

घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे 

श्रीचक्रधरस्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम 

संदर्भग्रंथ आहे.

2)प्राचीन भारतीय स्थलकोश (१९६९) : 

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना 

केली आहे. वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, 

पाणिनीचे व्याकरण, वाल्मीकी-रामायण, महाभारत, 

पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, 

तसेच फार्सी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य

यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली 

आहे.



2)विश्वकोश :-

Ans-महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री

यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य

यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य

संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस 

चालना दिली. 

2)तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या

नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. 

जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये आणले 

आहे. 

3)इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या

महत्त्वाच्या नोंदी यात आहे.


3)संज्ञा कोश:-

Ans-1) तिहासातील संज्ञा वेगळ्या

काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार 

करतात. 

2)अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. 

इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोशरचनेच्या

कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही 

विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे

आवश्यक असते.

3)प्रत्येक विषयाला इतिहास असतो. 

इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना 

कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश 

इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात.

4)या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य

संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवसायाच्या

संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकात 

दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हांला तुमच्या

आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल.

4) सरस्वती महाल ग्रंथालय:-

Ans-1) तमिळनाडूतील तंजावर येथील ‘सरस्वती 

महाल ग्रंथालय’ हे इसवी सनाच्या सोळाव्या-

सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात 

बांधले गेले. 

2)इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजे 

भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि

स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. 

3)व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशंजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यांमध्येसरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. 

3)त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन १९१८ मध्येया ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत.



4)४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(१) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?

Ans-1) ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे 

असतात. ग्रंथालयशास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती 

तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांशी निकटचा 

संबंध आहे.

2) ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर 

आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे 

प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार 

पाडली जातात.

3)यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. 

वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा नेमके ग्रंथ 

उपलब्ध करून देणे, या गोष्टीला ग्रंथालय

व्यवस्थापनात अत्यंत महत्त्व आहे.


(२) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे 

महत्त्वाची आहेत?

Ans-1) अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या

ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या

नोंदी असलेली कागदपत्रे त्यांमध्ये कोणताही बदल 

न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे 

आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात.

2)त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत 

विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालींच्या

उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे 

आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे 

माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे.



5) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.



Ans-1) शब्दकोश

2) विश्वकोश

3) सूची वाड्मय

4)कोशसदृश्य वाडमय

I hope this article  is useful 

Please follow me 








No comments:

Post a Comment

Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map