google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : 2) इतिहास लेखन: भारतीय परंपरा प्रश्न उत्तर

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Thursday, May 13, 2021

2) इतिहास लेखन: भारतीय परंपरा प्रश्न उत्तर






 इतिहास लेखन: भारतीय परंपरा प्रश्न  उत्तर 
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक---- हे होते
Ans.    अलेक्झांडर कमिंगहँम

2) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद---- यांनी केला.
Ans-       फ्रेडरिक   मॅक्सम्युलर

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा
1) हू वेअर शुद्राज- वंचितांचा इतिहास
2) स्त्री पुरुष तुलना- स्त्रीवादी लेखन
3) द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 - मार्क्सवादी इतिहास
4) ग्रँड डफ- वसाहतवादी इतिहास
चुकीची जोडी (3)
बरोबर उत्तर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857- राष्ट्रवादी इतिहासलेखन 

2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली.
Ans-1) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्म जाणिवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनात प्रवृत्त केले.
2) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला.
3) आपल्या प्रात्यक्षिक वैशिष्ट्यंकडे इतिहासकारांचे लक्ष  वेधले गेले. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रात्यक्षिक इतिहास लेखनाला चालना मिळाली.
2) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
Ans-1) शूर वीरांचे ,गुणगान ऐतिहासीक घडामोडी ,लढाया, थोर पुरुषांची चरित्रे ,याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते.
2) मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीची माहिती यातून मिळते.
3) भाऊसाहेबांची बखर या बखरीत  पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे .याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशीही स्वातंत्र्य बखर आहे .होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते.
4) बकरी चे काही प्रकार पडतात बकरीचे चरित्रात्मक, वंशानू चरित्रात्मक, प्रसंग, वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत.

प्र3) पुढील प्रश्नांची 25ते 30 शब्दात उत्तरे लिहा
1) मुगल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे?
Ans-1) मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांचे आत्मचरित्र तुझुक की बाबरी मध्ये त्याला कराव्या लागणाऱ्या युद्धाचे वर्णन आहेत.
2) त्याच्या बरोबरीने त्यांनी प्रवास केलेले प्रदेशांचे आणि शहरांचे वर्णन, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतीरिवाज, वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे.


2) राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते?
Ans-1) भारतीयांनी ब्रिटीशांविरुद्ध दिलेला स्वातंत्र्यलढा याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला.
2) त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि दा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस 1857 या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे.
3) राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहासलिहिण्याला ही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्ये आंकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.


प्र4) पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1) मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय?
Ans-1) मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पन्नाची साधने, पद्धती आणि उत्पन्नाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता.
2) प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते.
3) मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे ,रामशरण शर्मा कॉम्रेड, शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचे 'प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू सिल्वर ' हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे.

2) इतिहासाचार्य वि. का .राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा .
Ans-1) इतिहास लेखन भाषाशास्त्र ,उत्पत्ती, व्याकरण ,अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे राजवाडे परिचित आहेत.
2) आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे यांचा पुरस्कार त्यांनी केला.' मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे बावीस खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत.
3) "इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगिन समर्ग जीवनदर्शन. केवल राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी काट कटकारस्थाने आणि उदे यांचाच हाकिकत नव्हते", असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.


प्र5) पुढील तक्ता पूर्ण करा
जेम्स मिल                             द हिस्टरी ऑफ ब्रितिश इंडिया
जेम्स ग्रंड डफ                          ए हिस्ट्री ऑफ द मराठा
माऊंट स्टुडंट एल्फिन्स्टन।        द हिस्ट्री ऑफ इंडिया
श्री . अ.डांगे                              प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू।                                                                      स्लेव्हरी 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।        हु वेअर द शुद्राज


ब) संकल्पना चित्र पूर्ण करा


प्र6) पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1)प्राच्यवादी इतिहास लेखन
Ans-1) युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडे संस्कृती आणि देश यांच्या बद्दल कुतूहल जागृत झालेले होते त्याबद्दल आदर, कौतुक, असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते.
2) प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपियन भाषांमधील साधम्र्याचा  अभ्यास केला. वैदिक वाड्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. इसवीसन सतराशे 1984 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकत्ता येथे एशियाटिक सोसायटी ची स्थापना केली त्याद्वारे प्राचीन भारतीय वाड:मय आणि इतिहास यांचा अभ्यास चालना मिळाली.
3) प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फॅब्रिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाच्या प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला.
4) अलीकडच्या काळात राज्य प्राचयविदयावंतांचया लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड  सैद  या विद्यमानाने केले.

2) राष्ट्रवादीइतिहास लेखन:-
Ans-1) एकोणिसाव्या - विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामुळे मध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारती यांची आत्म जाणीव जागृत करण्यासाठी असलेल्या कल दिसतो त्यांच्या लेखनाचा राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते.
2) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखन आस विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशाप्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काल शोधण्याचा प्रयत्न केला.

3) करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे लक्ष केले गेले, राष्ट्रवादी इतिहास लेखन यामध्ये भारतीयांची देखील खूप मोठे योगदान आहे जशी कि वि का राजवाडे ,स्वातंत्र्यवीर सावरकर ,गोविंद रानडे, रामचंद्र मुजुमदार, सदाशिव आलेतकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणात दाखल देता येतील.

3) वंचितांचा इतिहास:-
Ans-1) वंचित समूहांचा इतिहास   लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच झाली, असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँडोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे.

2) भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसतो महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांच्या इतिहास नव्याने उलगडून दाखवला.

3) भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गांचा मोठा वाटा आहे भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनाकडे त्याकडे दुर्लक्ष केले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखन यापैकी 'हु वेअर द शुद्रज' आणि' द अनटचेबलस ' हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरणे म्हणून सांगता येतील.



No comments:

Post a Comment

Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map