google-site-verification=3ccttg2CvVnm5lZNF7i_OB6Mi5rxen7lfRepv_2dEyM google-site-verification: google0702dd00099c52c4.html Rushikeah Adalinge : August 2021

About Me

माझे नाव ऋषिकेश विषणु आदलिंगे

Sunday, August 15, 2021

इ 10वी भूगोल स्थान- विस्तार प्रश्न उत्तरे

 इ 10वी भूगोल स्थान - विस्तार प्रश्न उत्तरे 



प्र1) खालील विधाने योग्य की आयोग्य ते लिहा. आयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.


1) ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.

Ans-योग्य


2)  भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले 

Ans-अयोग्य 

 भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेला आहे


3) ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे

Ans-अयोग्य 

ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त  आहे


4) ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.

Ans-योग्य


5) ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे.

Ans-अयोग्य 

ब्राझील देशाला अटलांटिक  महासागराचा किनारा लाभला आहे



6) भारताच्या आग्नेयस पाकिस्तान हे राष्ट्र आहे

Ans-अयोग्य

भारताच्या  वायव्यस पाकिस्तान हे राष्ट्र आहे


प्र2. थोडक्यात उत्तरे लिहा 


अ) स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले ?

Ans-1)सुमारे दीड शतक भारत देश ब्रिटिशांच्या

अधिपत्याखाली होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य

मिळाले. 


2) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या तीस वर्षात तीन युद्धाला सामोरे जाणे अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड येणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे.



3) ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक  काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले.


4) विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे.




आ) भारत आणि ब्राझील हा या दोन्ही देशात स्थान संदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत.

Ans-1) भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे . आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे.



2) पृथ्वीवर ब्राझील देशाच्या काही भाग उत्तर गोलार्धात बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे.  तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे.


 इ) भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा.

Ans-

1) भारत-अक्षवृत्तीय विस्तार= भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४° उत्तर अक्षवृत्त ते ३७°६' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' अक्षावरील 'इंदिरा पॉईंट' हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे. 2) भारत-रेखावृत्तीय विस्तार= भारताचा रेखावृत्तीय विस्तार ६८°७ पूर्व रेखावृत्त ते ९७°२५ पूर्व रेखावृत्त आहे. 1) ब्राझील-अक्षवृत्तीय विस्तार= ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ५°१५° उत्तर अक्षवृत्त ते ३३°४५ दक्षिण अक्षवृत्त आहे. 2) ब्राझील-रेखावृत्तीय विस्तार= ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ३४°४५° पश्चिम रेखावृत्त ते ७३°४८ पश्चिम रेखावृत्त आहे.


प्र3. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा

(Direct Answer) 

1) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट नावाने ओळखले जाते


2) दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत चिली इक्वेडोर


3) दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारचे आहे



ई) खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनार भाग योग्य प्रकारे दर्शवतो ?(उ, ऊ, ए all direct answer in photo)


          *only tick mark answer is.                 write.                                answer *




Biomolecules class 11th mind map

 Biomolecules class 11th mind map